Friday, 13 October 2017

मसाला उद्योगाचे बादशाह एम.डी.एच (MDH) मसाला महाशय धरमपाल गुलाटी यांची प्रेरणादायी कहाणी.

मसाला उद्योगाचे बादशाह एम.डी.एच (MDH) मसाला
mahashay dharampal

महाशय धरमपाल गुलाटी यांची प्रेरणादायी कहाणी.

मसाला म्हटलं की आपल्याला आठवतो ‘एम.डी.एच (MDH) मसाला’. ज्या मसाल्याच्या प्रत्येक जाहिरातीमध्ये आपल्याला एक तेजपुंज अशी वृद्ध व्यक्ती दिसते. हेच ते महाशय धरमपाल गुलाटी. महाशिअन दी हात्ती अर्थात एम.डी.एच. चे सर्वेसर्वा. या मसाला कंपनीची स्थापना महाशय चुनीलाल यांनी १९१९ साली सियालकोट येथे छोटेसे दुकान उघडून केली होती. तेव्हापासूनच हा व्यवसाय जगभरात वाढतो आहे. अनेक देशांमध्ये या मसाल्याची निर्यात केली जाते.महाशय धरमपाल गुलाटी यांचा जन्म २७ मार्च १९२३ ला सियालकोट (पाकिस्तान) मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महाशय चुनीलाल आणि आईचे नाव चननदेवी असे होते. दोघंही धार्मिक आणि आर्य समाजाचे अनुयायी होते.धरमपाल यांनी पाचवीमधूनच शाळा सोडली. ते साल होते १९३३. त्यानंतर १९३७ मध्ये वडिलांच्या मदतीने त्यांनी छोटा व्यवसाय सुरू केला. मग काही दिवस साबणाचा व्यवसाय, त्यानंतर काही काळ नोकरीही केली. कपडे आणि तांदळाच्या व्यापारामध्येही त्यांना काही काळ आपले नशीब आजमावले. असे सगळे व्यवसायातले बरेवाईट अनुभव घेतल्यानंतर त्यांनी आपल्या मसाल्याच्या पारंपारिक व्यवसायातच यायचे ठरवले. त्यावेळी त्यांनादेग्गी मिर्चवाले’ या नावाने संपूर्ण भारतभर ओळखले जाईल.

MDH BRAND LOGO१९४७ साली दुर्दैवाने देशाची फाळणी झाली. धरमपाल गुलाटी भारतात आले. २७ सप्टेंबर १९४७ ला ते दिल्लीला आले, त्यावेळी त्यांच्याकडे फक्त १५०० रुपये होते. त्यातले ६५० रूपये खर्च करून त्यांनी एक टांगा विकत घेतला. नवी दिल्ली स्टेशनपासून कुतुब रोड आणि करोल बाग ते बडा हिंदूराव पर्यंत ते टांगा चालवत असत. त्यानंतर त्यांनी आपल्या पारंपारिक मसाला व्यवसायाची नव्याने मुहूर्तमेढ रोवली आणि पुनश्च ‘महाशिअन दी हात्ती ऑफ सियालकोट’ म्हणजेच ‘देग्गी मिर्चवाले’ यांचे नाव उज्जवल केले.
अत्यंत मेहनतीने, चिकाटीने आणि प्रामाणिकपणाने त्यांनी एमडीएच मसाला कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या या उत्तुंग यशामागे काही खास असे रहस्य नाही. फक्त व्यवसायातील नियमांचे आणि कायद्यांचे पालन केले आणि पुढे जातच राहिले.
व्यवसाय वाढवता वाढवता त्यांना ग्राहकांच्या हिताचाही विचार केला. ग्राहकांना संपूर्ण समाधान देण्याच्या उद्देशाने ते काम करतात त्यामुळेच आज त्यांची कंपनी यशस्वी आहे.व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने तर महाशय धरमपाल गुलाटी सक्रीय असतातच. पण सामाजिक बांधिलकीही ते तितक्याच निष्ठेने जपतात. नोव्हेंबर १९७५ ला त्यांनी १० खाटांचे हॉस्पिटल आर्य समाज, सुभाष नगर, नवी दिल्ली येथे सुरू केले. १९८४ साली आई चननदेवी हिच्या स्मरणार्थ जनकपुरी, दिल्ली येथे २० खाटांचे हॉस्पिटल सुरू केले. हेच हॉस्पिटल पुढे ५ एकरांच्या जागेत विस्तारले. आज ३०० खाटा असलेले हे हॉस्पिटल भारतातील नामवंत हॉस्पिटल्सपैकी एक आहे.हे हॉस्पिटल पश्चिम दिल्लीतील लोकांसाठी एक वरदान आहे. महाशय धरमपाल गुलाटी हॉस्पिटल सुरू झाल्यापासून आजतागायत तेथे जातात. सर्व देखरेख करतात. सुरुवातीपासून आजपर्यंत येथे गरीबांवर मोफत उपचार केले जातात. याशिवाय त्यांनी अनेक शाळा स्थापन केल्या आहेत. एमडीएच इंटरनॅशनल स्कूल, महाशय चुन्नीलाल सरस्वती शिशु मंदीर, माता लीलावती कन्या विद्यालय, महाशय धरमपाल विद्या मंदीर अशा अनेक शाळा त्यांच्या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांना एकट्यानेच २० पेक्षा जास्त शाळा स्थापन केल्या आहेत.जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता येईल. कौतुकास्पद गोष्ट अशी की ते दिवसातला काही वेळ गरीब मुलांसोबत व्यतीत करतात. कित्येक मुलींच्या विवाहासाठीदेखील त्यांना सढळहस्ते मदत केली आहे. त्यांना स्थापन केलेल्या सामाजिक संस्थांमधील सर्व मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी स्वतः धरमपाल गुलाटी यांनी घेतली आहे. याशिवाय त्यांचा इतर खर्च ते स्वतः उचलतात. त्यांच्या संस्थामधील मुले, मग ती कोणत्याही जातीधर्माची असोत, सर्वांना एकसारखीच वागणूक आणि प्रेम मिळते. सर्व धर्माचे सण तेथे साजरे केले जातात. सर्वांना सारखेच प्रेम देण्याच्या त्यांच्या या वृत्तीमुळेच आजवर ते कोणत्याही प्रकाराच्या विवांदामध्ये अडकले नाहीत.महाशय धरमपाल गुलाटी यांचे दर्शनशास्त्र सांगते, ‘जे जे तुमच्यकडे सर्वोत्कृष्ट आहे, ते ते जगाला द्या. तुम्ही दिलेले सर्वोत्कृष्ट तुमच्याकडेच परत येईल.’ त्यांचे हे बोल खऱ्या अर्थाने सार्थकी ठरताना दिसत आहेत. मसाला उद्योगामध्ये ‘एमडीएच’. हा ’बादशाह’ आहेच. शिवाय अनेक समाजोपयोगी कामांमध्येही ते अग्रेसर आहेत.महाशय धरमपाल गुलाटी यांचे योगदान भारतातील सर्व उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात काही शंका नाही.

Thursday, 12 October 2017

ANEES BHARTI

जिन के माँ बाप अदब नहीं सिखाते उन्हें ज़माना अदब सिखाता है 

Sunday, 8 October 2017

ए. पी. जे. अब्दुल कलाम


प्रसिद्ध व्यक्ती: ए. पी. जे. अब्दुल कलाम
जन्म दिनांक: १५ ऑक्टोबर १९३१
मृत्यू दिनांक: २७ जुलै २०१५
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: प्राध्यापक, लेखक, एरोस्पेस शास्त्रज्ञ
अल्प परिचय: ए. पी. जे. अब्दुल कलाम हे २५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७ या काळात भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.
अधिक जानकारी के लिए यहाँ क्लिक करे 
اردو مے جاننے کے لئے یہا کلیک کرے 

Saturday, 7 October 2017

अल्पसंख्याकांनी त्यांचे योग्य स्थान व त्यांनी करण्यायोग्य कार्य कोणते आहे?

अल्पसंख्याकांनी त्यांचे योग्य स्थान व त्यांनी करण्यायोग्य कार्य कोणते आहे

या देशातील अल्पसंख्याकांनी त्यांचे योग्य स्थान कोणते आहे व त्यांनी करण्यायोग्य कार्य कोणते आहे? याचा नीट विचार करायला हवा. ही गोष्ट खरी आहे की तोंडी काहीही म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये, एक सांस्कृतिक समुदायाच्या नात्याने अल्पसंख्याकांचा कसलाही वाटा नाही. मग काय, केवळ बहुसंख्याकांचे हल्ले थोपविणे आणि शासन-व्यवस्थेत काही हिस्सा मिळविण्यात आपली सर्व शक्ती खर्ची घालणे, इतकेच तुमचे कर्तव्य आहे? मग देश कोठेही जावो, तुम्ही संख्येने कमी आहात, म्हणून दुर्बल आहात, असा तुमचा समज आहे, परंतु निर्णायक शक्ती ही संख्येचा कमी-अधिकपणा नसून, ती मानवतेच्या गुणांवर असते. संख्या कमी असणे हा अपराध नसून, जगाला देण्यासाठी तुम्हापाशी कोणतीही देणगी नाही, हा वास्तविक अपराध आहे.तुम्हापाशी उन्नत व सच्चरित्र समाज निर्माण करण्याचे सिध्दान्त आहेत आणि आपली तत्त्वे पटविण्यासाठी व आदराचे स्थान मिळविण्यासाठी आवश्यक असणारे नैतिक बल आहेतर संख्येने तुम्ही कमी असलात तरी पर्वा नाही. कोणत्याही मानवसमुहास वजन व प्रतिष्ठा निर्माण करणारी बाब त्यांची संख्या नसतेतर त्यांच्या जीवनाचे सिध्दान्त व उच्च नैतिक चारित्र्याचे विभूषण मानव-समुदायात वजन व प्रतिष्ठा निर्माण करते. खेदाची गोष्ट अशी आहे की तिकडे तुमची नजर वळत नाही. पहिली गोष्ट अशी आहे की तुमचे दृष्टिकोन व तुमचे व्यवहार यांना आपल्या सांस्कृतिक वर्तुळात वेढून घेतले आहे. फार तर अनेक अल्पसंख्याकांशी संघटन करुन संयुक्त आघाडी उभारण्यापलीकडे तुम्ही जात नाही. हे सर्व उपाय स्वरक्षणाचे आहेत.हे उपाय यशस्वी जरी झालेतर तुम्ही थोडक्यात अधिक शक्तीनिशी संघर्ष करु शकाल अथवा राजकारणात काही तात्कालिक लाभ मिळवू शकालयापेक्षा अधिक काही लाभ होणार नाही. हे नकारात्मक धोरण आहे. एखाद्या संकटाच्या भयाच्या भावनेने जे लोक एकत्र येतातते अधिक काळापर्यंत एकत्रित राहू शकत नाहीत. संकट नाहीसे झाले की ते विघटित होऊन विखुरले जातात. तुम्हापाशी जर सामाजिक सिध्दान्त काही सकारात्मक उद्देश व आकर्षून घेण्याची शक्ती नसेलतर केवळ राजकारणाच्या लाभासाठी एकत्रित येणारे अल्पसंख्याकांचे समूह आपापसात डोकेफोड करुन एक वेगळाच उपद्रव निर्माण करण्यास कारणीभूत होतील. एखाद्या अल्पसंख्य समूहाला जर आदराचे स्थान प्राप्त करायचे असेलतर त्याला एकच उपाय आहे. त्याने देशापुढे असे तत्त्व मांडावेज्यामुळे देशातील सद्यस्थितीतील विघटनवादावर व दुरावस्थेवर उपाय सिध्द होईल आणि त्यांनी स्वतःमध्ये अशी गुणवैशिष्ट्ये निर्माण करावीत ज्यांचा स्वीकार करण्यास जातीयवादी व्यक्तीही बाध्य होईल.Friday, 22 September 2017

gharघर अपनो का घर सपनो का.........

सब ने इस विडीयो से सबक लेना चाहिये..........
अनिस भारती.....अध्यक्ष राहत फाउंडेशन भोकरदन